म्हसळा नगरपंचायतीत 29 पैकी 28 पदे रिक्त

0

म्हसळा । म्हसळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन 2 वर्षे 4 महिने झाले, तरीही 29 मंजूर पदांपैकी केवळ 1 शिपाई पदच भरल्याने तब्बल 28 पदे अजूनही रिक्त आहेत. म्हसळा नगरपंचायतची स्थापना 26 जून 2015 रोजी झाली आणि प्रशासक म्हणून तत्कालीन आणि तत्कालीन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी पदभार स्वीकारला. प्रशासक म्हणून वसावे यांनी आपल्या 13 जून 2015 ते 18 जून 2016 या सहा महिन्यांच्या कालावधीत चोख प्रशासन कसे असावे, याचा धडाच येणार्‍या राज्यकर्त्यांना दिला.

7 कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा
वास्तविक म्हसळा नगरपंचायतला 29 कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. परंतु, त्या कर्मचार्‍यांकडून काम करून घेताना मुख्याधिकारी गारवे यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच या तत्कालीन ग्रामपंचायतीतील कर्मचार्‍यांचे नगरपंचायतमध्ये अजूनही समावेश न झाल्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांचे व त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधारमय आहे. स्वच्छतेसाठी केवळ 7 कर्मचारी असल्याने व घंटागाडी म्हणून नगरपंचायतीच्या मालकीचा 1 ट्रॅक्टर व भाडेतत्त्वावर 2 ट्रॅक्टर एवढीच स्वच्छता यंत्रणा असल्याने शहरासमोर स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

नगरपंचायतीमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व कर्मचारी पुरेपूर नसल्याने काम करणे जिकिरीचे आहे. परंतु, त्यावर मात करून शहरातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असून, लवकरात लवकर मनुष्यबळ वाढवावे,
अशी मागणी केली आहे.
-वैभव गारवे, मुख्य अधिकारी.