म्हसळा बसस्थानकाची दुरवस्था, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

0

म्हसळा । श्रीवर्धन आगारांतर्गत येणार्‍या म्हसळा बसस्थानकाची पुरती दुर्दशा झाली आहे. गेले तीन ते चार माहिन्यांपासून आरक्षण कक्षांच्या वर्‍हांड्याची लादी निखळली असून अनेकदा सूचना करूनही आजतागायत या लादीचे काम न झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून लवकरात लवकर हे काम न केल्यास आम्ही आंदोलन करू असे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल श्रीधर महामुणकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलतांना म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, सदर वर्‍हाड्यांची लादी फुटल्यानंतर आम्ही तत्काळ वाहतूक नियंत्रक यांचे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. एवढेच उत्तर देऊन वेळ मारून नेली. मात्र, फुटलेल्या लाद यांचे नुतणी करण करण्यासाठी असा किती रुपयांचा निधी लागणार आहे की जेणेकरून या त्रासापासून प्रवाशांची सुटका होईल तरी येत्या आठ दिवसांत सदरचे काम पूर्ण न केल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडू, असा इशारा महामुणकर यांनी शेवटी दिला आहे.