म्हसळा । म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा म्हसळा यांच्या विद्यमाने वर्षावास प्रवचन कार्यक्रम विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. केंद्रीय शिक्षिका रत्नमाला जाधव यांनी अनित्य अनात्म व दु:ख विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीस भिमराव सुर्यतल व राजेंद्र मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वागत गीत सादर केले, श्रामणेर बौध्दार्चाय आयु. सुभाष साळवे यांनी कविता वाचन केले.
एन.के. जाधव यांनी प्रवचन केले. बहुसंख्येने कांझरी गावचे उपासिका व उपासक आणि तालुक्यांतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संतोष जाधव, ज्योती साळवे, गिता कांबळे, मनिषा मोरे, सुरेश जाधव, सूर्यकांत तांबे, बाबा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.