म्हसवे गावाजवळ ट्रकची कारला धडक, अपघातात तिघे पत्रकार जखमी

0

पारोळा- राष्ट्रीय महामार्गवरील म्हसवे गावाजवळ ट्रकने कारला धडक दिल्याने तीन जण जखमी झाले. त्यात दोन जण वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आहे. अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजता झाला. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेचे वृत्ताकंनासाठी एरंडोलकडून पारोळ्याकडे साम वृत्तवाहिनीचे राकेश विजय नेरुरकर (वय 35), टीव्ही-9चे नागेश रामू धोत्रे हे कारमधून (एमएच 46 एडी 1503) जात होते. कार नितीन भोसले चालवत होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास म्हसवेजवळील हॉटेल सहयोगजवळ ट्रकने (एमएच 19 झेड 5345) त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत नागेश धोत्रे यांच्या उजव्या पायास मार लागला. नितीन भोसले यांच्या डोक्यास व छातीवर गंभीर दुखापत झाली. तसेच राकेश नेरुरकर यांच्या उजव्या हातास गंभीर दुखापत झाली. तिघांना जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबादास गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला.