निजामपूर । येथील म्हसाई माता पतसंस्थेला अविज पब्लिकेशन, कोल्हापुर बॅकींग क्षेत्राचे सखोल आणि व्यापक ज्ञान असलेली प्रकाशन संस्था ‘बॅको‘ व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा बॅको पतसंस्था पुरस्कार 2017 साठीचा पुरस्कार म्हसाई माता महिला पतसंस्था मर्या. निजामपूरला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी लोणावळा येथील हॉटेल फरीयास रिसॉर्ट येथे अॅडव्हान्टेज 2018 या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह यांनी दिली.
महिला पतसंस्था 50 कोटी विभागातून निवड
अविज पब्जिकेशन, कोल्हापुर बॅकींग क्षेत्राचे सखोल आणि व्यापक ज्ञान असलेली प्रकाशन ‘बॅको‘ व गॅलेक्सी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॅको पतसंस्था पुरस्कार 2017 साठी सादर केलेल्या प्रश्नावलीमधील माहितीच्या आधारे निवड समितीने मुल्यांकनानुसार महिला पतसंस्था ठेवी 50 कोटी रूपयांपर्यंत या विभागातून म्हसाई माता महिला पतसंस्था मर्या. निजामपूर या पतसंस्थेची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही संस्थेला जिल्हा फेडरेशनतर्फे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. पतसंस्थेला हे यश प्राप्त करण्यात अनेकांचा हात सामील आहे. या सर्वांचे श्रेय निष्ठावान आणि समर्पित सेवकांना, जागरूक आणि सुजान सभासदांना, निष्ठवान ग्राहकांना आणि कोणताही स्वार्थ नसलेल्या, परस्पर विश्वासाने, सहकार्याने काम करणारे कार्यक्षम संचालक मंडळाला आहे म्हणून लक्ष्मीकांत शाह यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.