म्हसावदच्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या म्हसावद येथील वृध्दाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लोटन देवराम महाजन (60) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी लोटन महाजन हे शनिवार, 19 मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा कापण्यासाठी म्हसावद शिवारातील शेतात गेले असता बाजूला पडलेल्या विद्यूत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.खातीना पठाण यांनी मयत घोषीत केले. रविवार, 20 मार्च रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.