पोलीस उपनिरिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाचा छापा ; मोबाईल, वाहनांसह सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; 23 जुगार्यांना अटक व सुटका
जळगाव : म्हसावद येथे बंद पडलेल्या पोल्ट्रीफॉर्मच्या पत्रांचे शेडमध्ये सुरु पत्ता जुगाराचा क्लबवर गोपनीय माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने गुरूवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. कारवाईत पथकाने पोलिसांनी सुमारे 01 लाख 96 हजार 210 रूपयांची रोकड तसेच 22 मोबाईल, दुचाकी असा सुमारे 10 लाख 15 हजार 410 रूपयांचा मुददेमाल जप्त केला असून क्लबमालकासह 23 जणांना अटक केली. दरम्यान या शेतात गेल्या काही दिवसांपासून मटनावर ताव मारीत, मद्य रिचवित व्हीआयपी क्लबप्रमाणे सुविधा देवून जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हसावद गावापासून सुमारे एक किलो मिटर अंतरावर म्हसावद ते लमांजन रस्त्यावर मोहन पाटील यांच्या मालकीच्या गट नं. 49/50 मधील बंद पडलेल्या पोल्ट्रीफॉर्मच्या पत्रांचे शेडमध्ये अनिल कोळी (म्हसावद) हा आजुबाजुच्या गावातील लोकांना तीन पत्ती नावाचा पत्ता जुगार खेळविण्यास बोलावून जुगारांचा क्लब चालवित असल्याची गोपनीय माहिती उपअधिक्षक तथा सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना गुरूवारी मिळाली होती. त्या अनुषंगाने रात्री पथकासह ते म्हसावद येथे खासगी वाहनाने रवाना झाले.
खाजगी वाहने घेवून साध्या वेशात पोलीस धडकले
गावापासून काही अंतरावर वाहने थांबवून कर्मचार्यांनी पायीच पोल्ट्रीफॉर्मचे पत्रांचे शेड गाठले. मुख्य गेटमधून प्रवेश करत जुगार खेळणार्यांना ताब्यात घेतले. उपअधिक्षक डॉ. निलाभ यांच्यासह उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोलीस हवालदार सुनिल शामकांत पाटील, पोलीस हवालदार किरण धमके, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी,पोलीस हवालदार विजय काळे, पोलीस नाईक अनिल पाटील, कॉन्सटेबल रविंद्र सुकदेव मोतीराया, कॉन्सटेबल सचिन साळुंके, कॉन्सटेबल महेश महाले तसेच क्यूआरटी पथकातील कॉन्सटेबल जुबेर, कॉन्सटेबल नरेंद्र सोनवणे, कॉन्सटेबल महेश पवार,कॉन्सटेबल गोविंद जाधव, कॉन्सटेबल रविंद्र भारंबे यांनी ही कारवाई दोन पंचासमक्ष केली.
10 लाख 15 हजार 4 10 रूपयांचा मुद्देमाल जप्त
जुगार क्लबच्या बाहेर एक महिंद्रा बोलरो जिप गाडी क्रमांक एम.एच. 19 वाय 8118 तसेच सात दुचाकी त्यात एम.एच.15 सी वाय 727 7 हिरोहोंडा, एम.एच. 19
बी.आर.3750 डिस्कव्हर, एम.एच. 19 बी.ई.5392 फॅशन प्रो हिरो,एम.एच. 19 डी.डी.6706 हिरो डिलक्स, होंडा युनीकॉन नवी दुचाकी नंबर प्लेटवर मागे देवा गृप लिहलेले, एम.एच. 19 बी .एक्स. 3531 हिरो डिलक्स, एम.एच. 19 ए.वाय . 6345 फॅशन प्रो या दुचाकी मिळून आल्या. एकुण 1 लाख 96 हजार 210 रूपये रोख, जुगाराची साधने, चेकबुके, मोबाईल हॅन्डसेट 22 तीन पत्ती नावाचा हारजितचा पत्ता जु गार खेळतांना वापरण्याच्या चैनी व स्तु, एक महिंद्र बोलेरो, सात दुचाकी एकुण किंमत 08 लाख 19,200 रूपय े असा सुमारे 10 लाख 15 हजार 4 10 रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
या संशयितांना घेतले ताब्यात
जुगार खेळताना मिळून आलेल्या अनिल कोळी, प्रदिप न्हावी, समाधान पाटील,संभाजी पाटील, सौरभ कटारिया, सतिष चौधरी, महेमुद खाटीक, शांतीलाल भोई, जितेंद्र चौधर ी,विनोद सोनवणे, रविंद्र कोळी, फिरोज पटेल, भिकन खाटीक, फिरोज पठाण,अक्षय वाणी, शेख मेहबुब शेख, निलेश पाटील, विनोद पाटील, सुरेश सोनवणे, समाधान धनगर, आनंदा मोरे, लक्ष्मण सोनवणे, नितीन पोरवाल यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. व न्यायालयात हजर केले.