जळगाव । तालुक्यातील म्हसावद समूह साधन केंद्राची जानेवारी 2018 ची शिक्षण परिषद कुर्हाडदे येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाली. यावेळी केंद्रात माझी शाळा,डिजिटल शाळा हा उपक्रम राबवून सर्व शाळा 100 टक्के डिजिटल करण्यात येतील असे प्रतिपादन म्हसावद केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी केले. सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे काम करून शाळा डिजिटल कराव्यात असे आवाहनही यावेळी केले. यावेळी कुर्हाडदे, वाकडी, लमांजन या ग्रुप ग्रामपंचायत कडून या तीनही गावातील जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट एलईडी टीव्ही, कॉम्पुटर,सिपीयू, माऊस, किबोर्ड वाटप करण्यात आले.
शाळा डिजिटलर भर
जळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्हाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा डिजिटल व प्रगत करण्यावर भर दिला जात आहे. यावेळी बोलताना राजेंद्र सपकाळे म्हटले की, आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. प्रत्येकाला तंत्रज्ञान अवगत असायला पाहिजे तसेच ती काळाची गरज असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान रुजवणे हि शिक्षकाची जबाबदारी आहे. यासाठी शाळा डिजिटल होणे आवश्यक आहे. यामुळे अनेक क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत व जास्तित जास्त प्रभावीपणे समजवता येतात. तसेच जि.प.जळगाव ने डिजिटल अभ्यासक्रम तयार केला आहे त्याची अंमलबजावणी करणे देखील यामुळे सोपे होणार आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रुप ग्रा.प. लमांजन, कुर्हाडदे, वाकडी येथील सरपंच लताबाई सोनवणे, उपसरपंच गोरख पाटील, सदस्य अरुण पाटील, राजू पाटील, विलास पाटील शिरसोली उपसरपंच गोरख बारी, शिक्षण प्रेमी आनंदा न्हाळदे, समाधान कोळी, राकेश पाटील, मुख्याध्यापक पंकज भोसले, शैलेंद्र सोनवणे, संजय जोगी, कल्याण पाटील, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट एलईडी टीव्ही, कॉम्पुटर,सिपीयू वाटप करण्यात आले.