शहादा । तालुक्यातील म्हसावद येथील श्री अंबाजी माता मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पर्यावरण पुरक दहिहंडी साजरी करत वृक्षा रोपण करण्यात आले. या वेळी बाल गोपालांसाठी अंबाजी माता भक्तमंडळातर्फे दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वृक्ष संवर्धन या उपक्रमाच्या अनुशंगाने पर्यावरण पूरक दहीहंडी म्हणून संगीता जयस्वाल, उषा लांडगे, सुनीता लांडगे, ज्योती पवार, स्वाती लांडगे, तुळसाबाई कुंभार, अंबालाल लांडगे, दुशंत कुवर,डॉ. रजनीकांत सूर्यवंशी, गोरख लांडगे, अशोक बागले, विनोद ठाकरे, गोरख ठाकरे रमण लांडगे, भिका सूर्यवंशी, राजाराम पाटील, दिनेश सूर्यवंशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भविष्य काळात बाल उद्यान म्हणून परिसराचा विकास करण्याचा या भक्त मंडळाचा मानस आहे. महाआरती नंतर गोपाळ काला साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण व राधा राणी यांच्या वेशातील बालगोपाल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी गावातील महिला, बालके, नागरिक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मंदिराचे, वसंत कुलकर्णी, दुशंत कुवर, भीमसिंग गिरासे, विजय वाघ, योगेश लांडगे, हिरामण पाटील, महेश जगदाळे तसेच मंडळाचे पदाधिकारी आदिंनी परिश्रम घेतले.