म्हसावद रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रात

0

720 प्रवाशांकडून चार लाख 40 हजारांचा दंड वसुल ; दहा गाड्यांची तपासणी

भुसावळ- विना तिकीट रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत शुक्रवारी म्हसावद रेल्वे स्थानकावर 30 तिकीट निरीक्षकांसह 15 रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांच्या चमूने 740 फुकट्या प्रवाशांकडून तब्बल चार लाख 40 हजारांचा दंड वसुल केला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन पॅसेंजर गाड्यांसह आठ एक्स्प्रेस गाड्यांची तपासणी करण्यात आली तसेच तपासणी पथक बसने म्हसावदपर्यंत गेल्यानंतर अचानक सकाळपासून तपासणी सुरू करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली.

यांच्या पथकाने केली कारवाई
वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या उपस्थितीत 30 तिकीट निरीक्षकांसह 15 रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांसह तिकीट निरीक्षक एन.पी.पवार, आर.पी.सरोदे, ए.आर.सुरवाडकर, शेख सत्तार, एल.आर.स्वामी, के.के.तांती, दीपाली बोबडे, पुष्पा देवी, संजय वर्मा, एन.पी.अहिरवार, वे.दी.पाठक, वि.के.संचन, हेमंत सावकारे, ए.एस.राजपूत आदी सहभागी झाले होते.

दहा गाड्यांमधील 740 प्रवाशांकडून दंड वसुल
म्हसावद स्थानकावर गाडी क्रमांक 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12167 दादर-वाराणसी एक्स्प्रेस, 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, 51181 देवळाली-भुसावळ पॅसेंजर, 12165 लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी सुपरफास्ट एक्स्प्रेस, 12779 वास्को-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक काशी एक्स्प्रेस, 11094 वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस, 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस, 11078 जम्मू-तवी पुणे झेलम एक्सप्रेस या गाड्यांची तपासणी करण्यात आली. 740 प्रवाशांकडून चार लाख 40 हजार 110 रुपये दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. विना तिकीट प्रवास करणार्‍या 182 प्रवाशांकडून एक लाख 37 हजार 160 रुपये दंड तसेच रीझर्व्ह डब्यातून आरक्षण नसताना प्रवास करणार्‍या 552 प्रवाशांकडून तीन हजार दोन हजार 350 रुपये दंड तसेच सामानाची बुकींग विना वाहतूक केल्याप्रकरणी सहा केसेसच्या माध्यमातून 600 रुपये दंड वसुल करण्यात आला.