मुंबई : मुंबईत घर घेण्याच स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या १३८५ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात डिसेंबर १६ला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. यासाठी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख व त्यापेक्षा जास्त आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त आहे. म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत आहे. तर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घराची किंमत सर्वाधिक ५ कोटी ८० लाख रुपये आहे.
घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा
अत्यल्प प्रवर्ग उत्पन्न मर्यादाः २५०००
– अल्प उत्पन्न -२५ ते ५० हजार
– मध्यम ५० ते ७५ हजार प्रति महिना