वडगाव मावळ । वडगाव मावळ येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू नितीन म्हाळसकर यांची जागतिक मास्टर बेंचप्रेस व आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
जम्मू येथे झालेल्या फेडरेशन चषक बेंचप्रेस स्पर्धेमध्ये म्हाळसकर यांनी 135 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 74 किलो गटात 530 किलो वजन उचलून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे नितीन म्हाळसकर यांची एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिका येथे होणार्या जागतिक मास्टर बेंचप्रेस स्पर्धेसाठी व मे महिन्यात उदयपूर येथे होणार्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.
नितीन म्हाळसकर यांना वडगाव मावळ येथील महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबमध्ये क्रिडा प्रशिक्षक अॅड. रवींद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभले. म्हाळसकर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेपासून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये मावळ तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.