म्हैसवाडी शिवारातून 18 हजारांची ताडपत्री लंपास

0
फैजपूर :- येथून जवळच असलेल्या म्हैसवाडी शिवारातील राजेश तुकाराम मानवतकर (भुसावळ) यांच्या शेतातून चोरट्यांनी 18 हजार 400 रुपये किंमतीची ताडपत्री लंपास केली. मानवतकर यांनी शेततळे तयार केली असून त्यात पाणी टिकून रहावे म्हणून ताडपत्री अंथरण्यात आली होती. चोरट्यांनी ही ताडपत्री चोरल्याने फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.