म.ए.सो. विद्यालयात गणेशाची प्रतिष्ठापना

0

पुणे । म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली. प्रशालेतील घोष, एनसीसीच्या विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक भारमळ यांच्या हस्ते गणरायाची मूर्ती आणण्यात आली.

प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका इष्टे, पर्यवेक्षिका तांबे यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर गणरायाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर प्रशालेच्या ग्रंथालयात विधिपूर्वक गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लॅब असिस्टंट काशिद यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. कार्यक्रमात आरती, अथर्वशीर्ष पठण व अन्य विधींद्वारे गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.