शहादा । कोंढावळ येथे दि 7 एप्रिल रोजी संध्याकाळी महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ते पुणे येथील यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन यशवंत गोसावी आणि मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील चिंतामणी एकता गणेश मित्र मंडळातर्फे करण्यात आले होते.
स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली…
व्याखानात यशवंत गोसावी म्हणाले की,तरुणांनी इंटरनेट , व्हाट्सअप यांच्या मागे न लगता शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांची व त्यांचा जीवन चरित्रांची अभ्यास करुन जनजागृती केली पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले व आई सावत्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणासाठी तसेच स्री भ्रुणहत्या सती प्रथा आदि विषयांवर बंदी आणून मोठी चळवळ उभी केली. यांच्यामुळे आज समाज शिक्षित झाला आहे. आज शिक्षणामुळे कोणी कलेक्टर तहसीदार न्यायाधीश , तलाठी ,ग्रामसेवक आदि पदावर आपले पाल्य आहेत. आज महात्मा फुले यांचे विचार आजचा तरुणांनी समाजात आणुन समाज चांगला घडवला पाहिजे त्याची आज समाजाला गरज आहे अणि ते फक्त आजचा तरुण करू शकतो. याव्याख्यानाप्रसंगी कोंढावळसह परीसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी चिंतामणी एकता गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकरी यांनी परिश्रम घेतले.