पिंपरी-चिंचवड । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 61 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुळशी तालुक्यातील भूगाव येथे 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. सलग दुसर्या वर्षी स्पर्धा भरविण्याचा मान पुण्याला मिळाला आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निवडीसाठी मावळ तालुक्यातील जांभूळ येथे 16 नोव्हेंबर रोजी मावळ तालुका निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे.
कुस्तीगीरांची वजने सकाळी नऊ ते दुपारी 12 या कालावधीत घेतली जाईल. किशोर, कुमार, वरिष्ठ गादी व माती अशा चार विभागात होणार्या स्पर्धेसाठी विविध वजनी गट आहेत. किशोर विभाग – 25, 28, 32, 35, 38 किलो, कुमार विभाग- 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 किलो, वरिष्ठ गादी व माती विभाग- 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो (86 ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गट)
जांभूळ ग्रामपंचायतीतर्फे आयोजन
जांभूळ ग्रामस्थ आणि ग्रुप ग्रामपंचायत आयोजित ही चाचणी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सहयोगी उपाध्यक्ष मारुती आडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबरशेठ भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापूसाहेब भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, वस्ताद विजय आहेर, स्पर्धेचे मुख्य आयोजक उपसरपंच अंकुश सुदाम काकरे, पै. बाळासाहेब काकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये पै. मारुती वाघूजी आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस, पै. मारुती बहिरु आडकर, पै. बंडू येवले, पै. तुषार येवले, वैभव भुतेकर, श्रेया शंकर, कंधारे, जुही जांभुळकर, कार्तिक काकरे, ओंकार काकरे, अपूर्वा शिंदे यांचा समावेश आहे.