कटक: यावर्षात ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे स्टार चांगलेच चमकले. ‘हिटमॅन’ने अनेक रेकोर्ड या वर्षात मोडून नवीन रेकोर्ड नावावर केले. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यातही रोहितने नवा रेकोर्ड केला. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. फलंदाजी दरम्यान ९ वी धाव काढत रोहित एका कॅलेंडर वर्षात सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मोडला आहे. लंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने १९९७ साली सलामीवीर या नात्याने २३८७ धावा काढल्या होत्या, आता हा विक्रम रोहितच्या नावे जमा झाला आहे.
निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडिजने भारतासमोर ३१६ धावांचे आव्हान उभे केले आहे.