यंदाच्या आयपीएल खरेच फिक्स होत्या का?

0

मुंबई | यंदाच्या आयपीएल, त्यातल्या त्यात फायनल मॅच खरोखरच फिक्स होती का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही शोधले जात आहे. सोशल मीडियात त्याची आजही जोरदार चर्चा सुरूच आहे. त्यातच गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडीयमवरील सामन्यादरम्यान पकडल्या गेलेल्या तीन हायप्रोफ़ाईल बुकींचा तपास गुंडाळून ठेवण्यात आल्याने संशयाचे ढग अधिक गडद होते आहेत. गुजरातचे दोन खेळाडू संपर्कात असल्याचे या बुकींनी प्राथमिक चौकशीत कबूल केले होते. या खेळाडूंची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी जाहीरही केले होते. मात्र, आता हे सारे प्रकरण दाबले जात आहे. कानपूरमधील बुकींना ग्रीन पार्कच नव्हे टर इतरही ग्राऊंडमन खेळपट्टीचे फोटो पाठवत असावेत, असा संशय आहे.

‘ट्वीटर’बहाद्दर गुलदस्त्यातच
पुणे व मुंबई यांच्यातील अंतिम सामन्यात ‘ट्वीटर’वर ८ सनसनाटी व अचूक ट्वीट करणाऱ्याचाही शोध घेण्यात अजून सायबर सेलला यश आलेले नाही. क्रिकेट इनसायडर @theDcricket नावाने हे ट्वीट केले गेले होते. नाणेफेक जिंकण्यापासून, सामन्यात एकाही नोबॉल नसेल, मुंबई १२० ते १३० धावा करून बाजी मारेल, राहुल त्रिपाठी दहा धावांच्या आत बाद होईल, स्मिथ सर्वाधिक स्कोअर करेल आणि मुंबई शेवटच्या षटकात जिंकेल, हे सर्व ट्वीट मॅच ठरवून खेळली गेल्याकडे इशारा करणारे होते. त्यांची तेव्हा चर्चाही झाली; पण सामन्याचे सारे भविष्य माहिती असलेला क्रिकेट इनसायडर महिन्यानंतरही गुलदस्त्यातच राहिला.

बेटींगला कायदेशीर परवानगी
भारतात बेटींगला कायदेशीर परवानगी देण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या विधी आयोगाने बेटींग अधिकृत करण्याबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. भारताचे माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनीही बेटींगला कायदेशीर परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे या व्यवसायातून पैसा कमावून देशविरोधी कारवायात वापरणाऱ्या दहशतवादी संघटनांना लगाम बसेल, अशी त्यांची भूमिका होती. आयपीएल मॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या मुदगल आयोगाचे सदस्य नीलय दत्ता यांनीही याबाबत अनुकूल अभिप्राय नोंदविला आहे. मात्र, बेटींग किंवा जुगराबाबत देशात एक समान कायदा नाही. घटनेच्या सातव्या शेड्यूलमधील कलम २५२ नुसार हा अधिकार राज्यांना आहे.

बेटींगपायी ८ वर्षात २५ खून
कर्नाटकमधील मंड्या येथून दोन आठवड्यापूर्वी एमएस दीक्षित या 18 वर्षांच्या डिप्लोमा विद्यार्थ्याला अटक केली गेली. त्याच्यावर शशांक या नववीतील मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. आयपील बेटींगमध्ये गमावलेले पैसे द्यावेत म्हणून पंटर्सनी त्याच्याकडे तगादा लावला होता. शशांकने अशा स्थितीत मदत न केल्याने त्याची हत्या केली गेली. गेल्या ८ वर्षात कर्नाटकमध्ये बेटींगपायी तब्बल २५ हत्या झाल्या आहेत. मोठ्या शहरातून ग्रामीण भागात या व्यवसायाचे केंद्र सरकले आहे. अनेक विद्यार्थी व तरुण बेटींगपायी बर्बाद होत आहेत.

३,००,००० कोटी क्रिकेट बेटींग मार्केट
युट्युबवर व्हिडीओजना लाखो हिट्स
व्हिडीओ – IPL T20 Match Fixing Video proof of fixing and betting

हिट्स – 495,668

हिट्स – मिल गए सबूत, आईपीएल 2017 का फाइनल FIXED था..
हिट्स – 596,492 views