मुंबई : गणेशोत्सव म्हटला की, मुंबई, पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. अशा वेळी या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. विशेष म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीच्या वेळी हे पर्यटक मोठ्या संख्येने जमतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला असतो. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटीवर विदेश पर्यटकांसाठी खास स्वतंत्र मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या स्वतंत्र मंडळामध्ये वायफाय, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय आणि अन्य सुविधाही देण्यात येणार आहे.याकरता महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळही सहाय्य करणार आहे. 25 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी असून त्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांची फौज उभी करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू केले असून त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.