धुळे । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागाचा एकूण निकाल 88.33 टक्के लागला आहे. त्यात सर्वाधिक नंदुरबार 91.03, धुळे 98.89, जळगाव 87.62 तर सर्वात कमी निकाल नाशिक (87.09 टक्के) जिल्ह्याचा लागला आहे. विभागातून 1 लाख 40 हजार 575 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तथापि, धुळे जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. धुळे शहरी भागातून 5 हजार 496 तर धुळे जिल्ह्यातून 21 हजार 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 9 जूनला विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळतील. सकाळी 11 वाजता गुणपत्रिका शाळेपर्यंत पोहचवण्यात येतील. त्यानंतर तीन वाजल्यापासून शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप होईल.
तर्हाडी कॉलेजचा निकाल
तर्हाडी । येथील ज्यु.सायन्स कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला. त्यात प्रथम मयुरेश सुभाष लांडगे 80 टक्के, द्वितीय दिपाली तुळशीराम बोरसे 78.30, तृतीय समाधान तुळशीराम बोरसे 75.53 टक्के गुण मिळवून यशाचे मानकरी ठरले. एकुण 66 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ होते. तसेच एच.आर.पटेल कन्या महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के, नूतन महाविद्यालय ज्यु. कॉलेज भटाने 79.16 टक्के व आर.सी.पटेल ज्यु.कॉलेज टेकवाडे 93.33 टक्के एवढा लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच अभिनंदन केले आहे.
‘हस्ती’ची परंपरा कायम !
दोंडाईचा । हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्यु.कॉलेज इ.12 वी विज्ञान शाखेचा सतत तिसर्या वर्षीही 100 टक्के गुणवत्तायुक्त निकाल लागला. 2016-17 या शैक्षणिक वर्षी हस्ती ज्यु.कॉलेजचे एकूण 15 एच.एस.सी.बोर्ड परिक्षेस प्रविष्ठ झाले होते. यात प्रणय छाजेड 85.38 टक्के, कल्याणी श्रॉफ 79.85 टक्के व वैभव काटोरे 78.46 टक्के या तीनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळविला.
आर.सी.पटेल संस्थेचा जलवा!
शिरपूर । शालांत उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल ऑनलाईन लागून यात शिरपूर तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान आरसीपी इंग्लिश स्कुलची भूमि पटेल हिने 90.15 टक्के गुण मिळवून पटकाविला. आरसीपीच्या 16 शाळांचा निकाल 100 तर किसान विद्या प्रसारक संस्थेच्या 8 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. आर.सी.पटेल विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागून विनीत पांडूरंग पाटील व ऋषीकेश वासुदेव चौधरी यांनी प्रत्येकी 84.84 टक्के, गौरव मनोहर महाजन 83.53, जयेश भिकन चौधरी 82.76, उत्सव जयेंद्र ब्रम्हभट 82.76 टक्के मिळविलेत. एच.आर.पटेल विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. अंजना कालुसिंग वळवी 86.46, राजेश्वरी राजेंद्र गुघे 85.84, श्रृती अजय गुजराथी 85.07, तेजस्विनी राजेंद्र पाटील 84.92 टक्के मिळविलेत. आर.सी.पटेल इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागून विज्ञान शाखेची भूमि प्रितेश पटेल 90.15 टक्के मिळवून तालुक्यात सर्वप्रथम आली. गुंजन अविनाश जैन 87.08, मयुरी रवींद्र रत्नपारखी 85.69, रोजन नितीन कलाल 85.08 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेत. येथील मुकेशभाई पटेल सैनिकी ज्युनिअर कॉलेजचा निकाल 97.14 टक्के लागला. रोशनी गोविंदा चौधरी 89.8, किसन जगदीश पटेल 77.85, राहुल दत्ते जोरावर 76.61 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेत. येथील आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळेचा निकाल 96.17 टक्के लागला असून अरविंद राधेश्याम पावरा 77.07, राकेश रागा पावरा 76.76, सचिन रामचंद्र पावरा 76 टक्के प्राप्त केलेत.येथील आर.सी.पटेल उर्दू विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 98.31 टक्के लागला. सैय्यद आरजू सै.जाकीर 79.38, मलक उजमा परवीन जाकीर 79.38, काझी फायझा सईमान जलीस अहमद 77.23 टक्के मिळविलेत. निमझरी येथील आर.सी.पटेल विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागून दीपक भानुदास पावरा 70, अरविंद विक्रम पावरा 68.76, राहुल विरसिंग पावरा 68.30 टक्के मिळविलेत. वाघाडी येथील आर.सी.पटेल विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागून सुदर्शन हंसराज पावरा 77.53, सागर गुमान पावरा 75.69, गुड्डी ईश्वर वळवी 71.69 टक्के मिळविलेत. शिरपूर येथील आर.सी.पटेल कला महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून प्रगती राजेंद्र उभाळे 82, जागृती सुभाष निकुंभे 80.77, काजल बाळू सनेर 77.08 टक्के मिळविलेत. एच.आर.पटेल कला महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. त्यात नितीशा पोपटराव सोनवणे 87.54 प्रियंका दिलीप सोनार 82.46, शुभांगी शालिक कोळी 81.8 टक्के मिळवून अनुक्रमे उत्तीर्ण झालेत. खर्दे येथील आर.सी.पटेल कला शाखेचा निकाल 100 टक्के लागून रितीका अभिमन महाजन 84.76, स्वाती रवींद्र शिरसाठ 81.23, गायत्री श्रावण कोळी 80.30 टक्के मिळविलेत. भोरखेडा येथील आर.सी.पटेल कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला. त्यात सोनाली नवलसिंग पावरा 82.76, नेतल रोहिदास पवार 82.15, शितल जालम राठोड 81.38 टक्के मिळविलेत. टेकवाडे येथील आर.सी.पटेल कला शाखेचा निकाल 93.33 टक्के लागला. त्यात योगीता दिवानसिंग गिरासे 84.61, वैशाली सुभाष कोळी 84.61, पूनम अजबसिंग गिरासे 83.23, रिंकू सुकलाल भोई 79.69 टक्के मिळविलेत. वरूळ येथील एच.आर.पटेल कला शाखेचा निकाल 100 टक्के लागून गायत्री राकेश कोळी 84 टक्के, शितल रवींद्र पाटील 83.38, ज्योत्स्ना राजेंद्र पाटील 82.46 टक्के मिळविलेत. खंबाळे येथील आर.सी.पटेल कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून नितीन पुंडलिक कोळी 83.07., रियाना नूर हबीब तेली 78.92, नितीन दिलीप कोळी 78.76 टक्के मिळविलेत.
शिंदखेड्यातही मुलींच्याच यशाचा झेंडा
शिंदखेडा । राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शिंदखेडा येथील एम्.एच्.एस्.एस्.कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.21 टक्के लागला आहे.526 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 495 विद्यार्थी पास झालेत. महाविद्यालयात विज्ञान शाखेची विद्यार्थीनी योगिता राहेजा प्रथम आली आहे. यावर्षी देखील निकालात मूलींनी बाजी मारली आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत 247 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते त्यापैकी 243 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल 98.38 टक्के लागला आहे.यांत प्रथम राहेजा योगीता (83.69टक्के), व्दितीय धिवरे रचना (83.07),गिरासे दिपक दिलीप(83.07),तृतीय वाघ शिवानी रविंद्र(82.76). आर्टस् शाखा : – या शाखेत 156 विद्यार्थ्यांपैकी 138 विद्यार्थी पास झाले असून 88.46 टक्के निकाल लागला आहे.यांत प्रथम – धनगर सोनल निंबा(76.15टक्के), व्दितीय-दवले नितिता आसाराम(74.76),तृतीय-वाघ गायत्री सूनिल(74.30). कॉमर्स शाखा:- या शाखेतून 44 विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थी पास झाले असून शाखेचा निकाल 97.72 टक्के लागला आहे.यांत प्रथम-माळी कविता कैलास(74.61), व्दितीय-माळी ज्योस्ना सुदाम(74.00), तृतीय-पाटिल पूजा कैलास(70.00) किमान कौशल्य विभाग:- किमान कौशल्य विभागात 79 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 70 विद्यार्थी पास झाले आहेत.विभागाचा निकाल 88.60 टक्के लागला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.रमेश देसले,सचिव आनंदा चौधरी,पदाधिकारी,प्राचार्य ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वामी समर्थ महाविद्यालय
या महाविद्यालयाचा निकाल 96.34 टक्के लागला आहे. त्यात प्रथम-अक्षय शरद खैरनार(79.53),व्दितीय-गायत्रीबेन धनराज पाटिल(72.15),तृतीय-धनश्री जगन्नाथ ठाकूर(71.37). संस्थेचे चेअरमन डॉ.आर. आर.पाटिल, पदाधिकारी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
जनता कनिष्ठ महाविद्यालय
या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 88.79 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत 77पैकी 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.05 टक्के निकाल लागला आहे.यांत प्रथम-खैरनार रोहित भटू(70.15), व्दितीय-चौधरी हर्षल विजय(69.38),तृतीय-खैरनार तेजस्विनी नरेंद्र(67.23) कला शाखेत40 पैकी 30 विद्यार्थी पास झाले असून शेकडा 75 टक्के निकाल लागला आहे. यांत प्रथम-तडवी सोनी सोनया(68.61), व्दितीय- वसावे वैशाली वन्या(67.23), तृतीय- वळवी सुमीत्रा बारशी(65.07). उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
31 मे ते 9 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांना 400 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यातून 24 हजार 441 परीक्षार्थींची नोंदणी करण्यात आली होती. त्यातून 24 हजार 409 परिक्षार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी एकूण 22 हजार 186 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 1 हजार 366 परिक्षार्थी उच्च श्रेणीत, 12 हजार 198 प्रथम, 8 हजार 402 द्वितीय आणि 220 परिक्षार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. सर्वाधिक विज्ञान शाखेचा जिल्ह्यात 98.04 टक्के इतका निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ 93.66 टक्के वाणिज्य, कला शाखेचा 82.38 टक्के निकाल लागला.