डोंबिवली : हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्था असलेल्या स्कायमेटने यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असतानाच पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांनी मात्र यंदा सरासरी पेक्षा चांगला पाऊस पडणार आहे अशी आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे दुष्काळाने हवालदिल झालेल्या शेतकरी राजा विसावणार आहे. नववर्षातील हि सर्वात महत्वाची बातमी ठरली आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाचा मोठा फटका बळीराजाला सहन करावा लागला. त्यामुळे कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांनी गळ्याशी फास ओढून घेतल. अडीच वर्षात सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. भारत का कृषी प्रधान देश असल्याने पावसावरच सगळी भिस्त अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय अनेक दिवसापासून गाजत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. केंद्र आणि राज्यसरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे दा कृ सोमण यांची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. एकीकडे स्कायमेटने कमी पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असणार आहे. देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पावसाचा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे. जूनमध्ये 102 टक्के पाऊस होऊ शकतो असेही स्कायमेटने वर्तवली आहे.
यामुळे पडणार चांगला पाऊस
सोमवार ७ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.तसेच बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी माघपौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहणही आपल्याला दिसेल. तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ सूर्यतेजात लुप्त झाल्यानेआपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. त्यामुळे नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांचे म्हणणे आहे.