पुणे-राज्य खड्डे मुक्त करू अशी घोषणा करून वर्ष उलटले मात्र अद्यापही राज्य खड्डे मुक्त झालेला नाही. दररोज खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. विशेषतः बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अधिक टीका केली जात आहे.
खड्डेमुक्त महाराष्ट्राचं दिवास्वप्न राज्याला दाखवून प्रत्यक्षात फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी टीका राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
खड्डेमुक्त महाराष्ट्राचं दिवास्वप्न राज्याला दाखवून प्रत्यक्षात फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!@supriya_sule #Potholes #MaharashtraRoads #DeathDueToPothole #SelfieWithPotHoles #Maharashtra #transport pic.twitter.com/Ew38GWkA1G
— NCP (@NCPspeaks) September 3, 2018
राष्ट्रवादीने ट्विटरवरून एक व्यंगचित्र जाहीर केले असून यात रोज होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना यमसदनी जावे लागते त्यामुळे यमाकडून देखील चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले जात असल्याचे व्यंगचित्रातून दाखविण्यात आले आहे.