यमुनानगर रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा

0

पिंपरी-चिंचवड : निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय असून निगडी परिसरातील नागरिक येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात महिलांसाठी प्रसूतिगृह, क्षयरोग निदान केंद्र त्याच बरोबर छोट्या आजारांवर उपचार केले जातात. परंतु सेक्टर क्रमांक 22 मधील सर्वच नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे रात्री-अपरात्री अपघाती रुग्ण किंवा गंभीर आजारी रुग्णांना पिंपरी येथील कै. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे यमुनानगर रुग्णालयात अतिदक्षता विभाग व 24 तास तातडीक सेवा सुरू करण्याची मागणी निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

सतत पाठपुरावा
सेक्टर क्रमांक 22 मध्ये असलेल्या यमुनानगर रुग्णालयात अतिदक्षता विभागासह 24 तास तातडीक सेवा सुरू करण्यासाठी किशोर हातागडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र, महापालिका प्रशासन सेक्टर 22 मधील रुग्णालयाचा प्रश्‍न व इतर विकासकामांना रेडझोनच्या नावाखाली दडपण्याच्या प्रयत्न करत आहे, असा आरोप हातागडे यांनी केला आहे. सेक्टर 22 हे रेडझोन मध्ये येते. म्हणून आम्ही रुग्णालय सुसज्ज करू शकत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे चुकीचे आहे. त्यावर पर्याय काढून नागरिकांना सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी हातागडे यांनी केली आहे.