यवतमध्ये दामिनी पथक नेमण्याची मागणी

0

यवत । रोडरोमिओंवर आळा बसविण्यासाठी दामिनी पथक सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग, दौंड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने यवत पोलिसांकडे केली आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दौंड तालुक्यातून पाटस, कुरकुंभ हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, मळद, रावणगाव, चौफुला, केडगाव, यवत भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वरवंडला जावे लागते. यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. बसची बाट बघत बस स्टॉपवर थांबलेल्या मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीवरून मुलींचा पाठलाग करणे, त्यांना बघून हॉर्न वाजवणे इ. प्रकार नेहमीच घडत आहेत. चौकात, बस थांबा, कॉलेजजवळ रोडरोमिओंची टोळकी थांबलेली असतात. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी येथे दामिनी पथक नेमावे, असे यवत पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यवत पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. राठोड यांनी हे निवेदन स्विकारले. इस्माईल सय्यद, विठ्ठल दोरगे, मोहसिन तांबोळी, मारुती फरगडे याप्रसंगी उपस्थित होते.