यवतमाळात मेडिकल कॉलेजात विद्यार्थ्यांची रॅगिंग

0

यवतमाळ । राज्यात रॅगिंगला कायद्याने बंदी घातली आहे.मात्र महाविद्यालयात रॉगिंग सारखा प्रकार सुरू आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविद्यालयात रॅगिग झाला आहे.रॅगिंग झालेल्या मुलगा रमेश (नाव बदलले आहे) याने 8 ऑगस्टला मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात प्रवेश घेतला होता.

पहिल्या दिवसापासून सिनियर विद्यार्थ्यांकडून रमेशला त्रास दिला जात होता.12 ऑगस्टला मनीष वासेकर, प्रतिक चव्हाण, बालाजी श्रीरामे, प्रशांत तुरपटवार, शंतनू ढोकणे, मिलिंद गरपिंडे या सहा जणांनी रमेशला 6 तासा गुडघ्यावर बसायला भाग पाडले. यापैकी तिघांनी 13 ऑगस्टला रमेशला दुपारी वसतिगृहाच्या रुम नंबर 25 मध्ये बोलावून पुन्हा मारहाण केली. त्याने कशीबशी सुटका करुन थेट चंद्रपूर जिल्ह्यातील आपले मूळ गावी गेल्यावर पाच दिवसांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रमेश आपल्या आई-वडिलांना घेऊन कॉलेजमध्ये आला. त्याच्या आईने रॅगिंबाबत कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्याकडे तक्रार दिली.