पुणे । पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पर्वती मतदार संघाचे अनील जोरी (प्रभाग क्र. 29) यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण शंकर शिंदे, सुरेश पवार, ईश्वर मते, विनायक चाचर, संजय गाडे, अविनाश वेल्हाळ, ययाती चरवड हे उपस्थित होते.शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवनमधील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे व कमल व्यवहारे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी अॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, उपमहापौर मुकारी अलगुडे, हाजीभाई नदाफ, सुनिल शिंदे, संगीता तिवारी, नरेंद्र व्यवहारे, द. स. पोळेकर, प्रा. वाल्मिकी जगताप, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, अमित बागुल, जॉन पॉल, धनंजय दाभाडे, चैतन्य पुरंदरे, जयकुमार ठोंबरे, सुनिल घाडगे, सतिश पवार, चेतन आगरवाल, नारायण पाटोळे, दिलीप लोळगे, विल्सन मॅसी, राजेंद्र पेशने, भगवान धुमाळ, राजा शिंदे, राजू साठे, विनय ढेरे, संदीप मोकाटे, विश्वास दिघे, सनमित चौधरी, नरेंद्र मते, रजिया बल्लरी, ताई कसबे, शारदा वीर आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.