यशस्वी कामगिरी करणार्‍या महिला व पत्रकारांचा सन्मान

0

जळगाव । स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था व स्वामी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालिका दिनानिमित्त नवरात्रीचे औचित्य साधून नारीशक्तीचा जागर व्हावा या दृष्टिकोनातून परिस्थितीशी दोन हात करुन यशस्वीरित्या जिंकणार्‍या महिलांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामिगिरी करणार्‍या पत्रकारांचा सन्मान रविवार २४ सप्टेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवाभवन येथे आयोजित केला आहे.

‘जीवनसंग्राम रणरागिणी २०१७’ पुरस्कारासाठी मनिषा बागुल, रुपाली जोशी, अर्चना येवले, कमल शिंपी, वैशाली बडगुजर, सरला महाजन, मालती येवले, मंदाकिनी मोरे, माधुरी चिंचोलकर, सुषमा चव्हाण, अनामिका जैन, कुसुम पाटील, संगिता गुजराथी, रुपाली थोरात, मंदा थाटे, ज्योती लोहार आदींची निवड करण्यात आली.

पत्रकारांमध्ये निरज वाघमारे, अरुण इंगळे, शकुंतला अहिरराव, शांताबाई वाणी, अमोल बाविस्कर, खेमचंद पाटील, संजय पाटील, अनघा डोहोळे आदींचा सत्कार होणार आहे. आमदार सुरेश भोळे, शितल करदेकर, आनंद शर्मा, विजय पाटील, रविंद्र महाजन, मंगला बारी, नरेश खंडेलवाल, डॉ.निलेश चांडक, सुनिल भंगाळे, नरेश चौधरी, सुषमा चव्हाण आदी उपस्थित राहणार आहे.