चिंचवड येथील कार्यक्रमात व्यक्त केले मत
चिंचवड : प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिलांनीच महिलांना यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. महिलाच कुटुंबाला सांभाळण्याचे काम करते. महिलांनी आपल्या मुलींना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलींना सक्षम करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे, मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. कृष्णानगर येथील जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलादिनाला विशेष महत्व
महिलादिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच महिलांच्या कर्तृत्त्वाला सलाम केलाच पाहिजे. महिलांच्या कर्तृत्व आणि शक्ति खूप अफाट आहे. इतिहासापासून ते आजच्या राजकारण, समाजकारण, पोलिस, सैन्य ते अगदी ट्रेन-मेट्रो चालविणार्या महिला आपण पहातो आहोत. त्यातून त्यांचे कर्तृत्व दिसून येते. त्यामुळे महिला कौतुकास पात्र आहेत, असेही पवार म्हणाले. यावेळी दामोदर मोरे, दिनेश गुंटे, ललिता पवार, वैशाली खामकर, योगिता केदारी, मिनाक्षी सरदार, सोनू भालेराव, स्मिता चव्हाण, अश्विनी शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी शिंदे यांनी केले. आभार सुशील शिंदे यांनी मानले.