शिरपूर। य शोशिखर गाठण्यासाठी गुणवत्ता, परीश्रम, जिद्द व चिकाटी खूपच आवश्यक आहे.आर.सी.पटेल अभियांत्रिकी महावियालयातील विद्यार्थ्यांनीराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पारितोषिकासह चांगल्या वेतन श्रेणीची नोकरी पटकावून हे सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी काढले. ते राष्ट्रीय स्तरावरील ‘केपीआयटी स्पार्कल-2017’या नाविन्यपूर्ण संकल्पना सादरीकरण स्पर्धेत सुवर्ण चषक,प्रमाणपत्र व रोख स्वरुपात पाच लाख रूपये तसेच केपीआयटी कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरी प्राप्त केलेल्या आर.सी.पटेल अभियांत्रिकी महावियालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील यांच्यासह संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल व संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या भेट घेतली.
आमदार पटेल यांनी जाणल्या तांत्रिक बाजू : ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञानाने व गुणवत्तेने कुठेही कमी नसून त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची व प्रोत्साहनाची गरज असते. माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी समाधान व्यक्त केले आ.अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटची तसेच सायकलची पाहणी करून त्यातील तांत्रिक बारकावे उत्सुकतेने जाणून घेतले. डिगंबर पाटील,वैभव नाईक,अतुल पाटील, अक्षय नेवे व अमोल सुर्यवंशी या विद्यार्थ्यांच्या तसेच हितेष पाटील,अक्षय कुंवर,योगेश जाधव,अविनाश कोळी,पुरूषोत्तम शिंपी यांनी ई बायसिकल अशा दोन नाविन्यपूर्ण संकल्पनांसह सहभाग घेतला होता.
प्रकाश जावडेकर यांनी केले सन्मानित
यात महावियालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या इनस्पेक्शन रोबोट फॅार ट्रांन्समिशन लाईन्स या नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या क्रियाशील प्रतिकृतीस (वर्किंग प्रोटोटाइप) केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सुवर्ण चषक,प्रमाणपत्र व रोख रूपये पाच लाख देवून गौरविण्यात आले होते.विशेष म्हणजे केपीआयटी कंपनीने वार्षिक 3.34 लाख रूपये या वेतनश्रेणीवर या सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनिअरपदी निवड केली आहे. प्रसंगी प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे आदी उपस्थित होते.