यश पाटील ठरला नवोदित मुंबई श्रीचा मानकरी

0

मुंबई । बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना आयोजित नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेसच्या सुयश पाटीलने बाजी मारताच त्याच्या चाहत्यांनी अंधेरीच्या राजाचा विजय असो, अशी घोषणाबाजी करून जेतेपदाचा आनंद साजरा केला. गणेश गल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शरीरसौष्ठवपटू घडवणार्‍या मनोहर पाठारे यांना शरीरसौष्ठवपटूंनी अनोखी आदरांजली वाहिली. तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल 220 नवोदित शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील प्रत्येक गटात 40-45 खेळाडू असल्यामुळे यातून आधी 15 खेळाडूंची आणि मग पाच खेळाडूंची निवड करताना पंचाची खूपच दमछाक झाली. अनेक गटांमध्ये गटविजेत्यासाठी अव्वल दोन-तीन खेळाडूंमध्ये कंपेरिझनही करण्यात आली. परब फिटनेसच्या किशोर राऊत, नितीन रुपाले या दोन खेळाडूंनी गटविजेतेपद संपादले. परळच्या हर्क्युलस जिमच्याही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांचाच समीर भिलारे उत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला.

नवोदित मुंबई श्रीचा निकाल
55 किलो वजनी गट । किशोर राऊत (परब फिटनेस), अविनाश वणे (पॉवर ऍड), ऋषिकेश परब ( कृष्णा जिम). 60 किलो ः साजिद मलिक (हार्डकोर), आकाश घोरपडे (स्लिमवेल), तुषार गुजर (मातोश्री). 65 किलो ः विनायक गोळेकर ( मातोश्री), चेतन खारवा ( ग्रो मसल), आदेश चिंचकर (आर.एम.भट), 70 किलो ः सुजीत महापत (लीना मोगरे), महेश पवार (पॉवर जिम), आशिष लोखंडे ( आर.एम.भट), . 75 किलो ः समीर भिलारे ( हर्क्युलस जिम), अमोल जाधव ( गुरूदत्त जिम), कल्पेश मयेकर ( परब फिटनेस). 80 किलो ः सुयश पाटील (फॉरच्युन फिटनेस), सिद्धीराज परब ( रिगल जिम), रोहन कांदळगावकर ( फोकस फिटनेस). 80 किलोवरील ः नितीन रुपाले (परब फिटनेस), रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस).