निंभोरा । सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने कठीण कामकाज ही यशस्वी होणे शक्य होऊ शकते असे प्रतिपादन निंभोरा पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांची बदली मुंबई येथे झाल्याने त्यांच्या निरोप समारंभ नुकताच पार पडला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कडू चौधरी हे होते. या कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांचे स्वागत केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांची बदली झाल्याने सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, कडू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद अवसरमल, सरपंच डिगंबर चौधरी, अनिल आसेकर, हभप सुभाष महाराज, मनोज सोनार, काशिनाथ शेलोडे, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी केले. या कार्यक्रमास फौजदार ज्ञानेश्वर पाकळे, माजी सरपंच अमन खान पठाण, रफीक शेठ, सचिन महाले, विजय सोनार, सरफराज खान, आरिफ खान, सईद खाटिक उपस्थित होते.