जळगाव : जिवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम गरजेचे असून कठोर परिश्रम हेच यशाचे गमक आहे. असे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस स्टेशनलचे पोलिस निरीक्षक सुनिल कुर्हाडे यांनी केले. दर्जी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पी.एस.आय. कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी अरूण पाटील, गोपाल दर्जी, ज्योती दर्जी आदी उपस्थित होते. संचालन रामकृष्ण करंके व आभार भुषण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्जी फाऊं डेशनच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.
750 जागेसाठी पदभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 750 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून 12 मार्च 2017 रोजी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेची तयारी संबंधी विस्तृत माहिती कार्यशाळेतुन देण्यात आली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध परिक्षेसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, नियोजन, परिक्षा पध्दत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
स्पर्धा वाढली आहे
सध्याच्या काळात शासनातर्फे जाहिर होणार्या परिक्षेतील रिक्त पदे आणि परिक्षेसाठी येणार्या अर्जाच्या संख्येत प्रचंड तफावत असून स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय नोकरीसाठी स्पर्धा वाढल्याने एका जागेसाठी हजारो अर्ज केले जात असते त्यामुळे विद्यार्थ्यानी आभ्यासात कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नाही. कठोर परिश्रमानेच यश मिळत असते असे मत पोलिस निरिक्षक सुनिल कुर्हाडे यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध परिक्षेसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, नियोजन, परिक्षा पध्दत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.