यश साध्य करण्यासाठी हुशार असून चालत नाही तर दुर्दम्य इच्छाशक्ती असावी

0

शहादा। यश साध्य करण्यासाठी केवळ हुशार असुन चालत नाही.त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.सामाजिक जबाबदारी जाणिव व कष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यास आकाशालाही गवसणी घालता येते.असे प्रतीपादन डॉ.योगेश भरसट (आएएस)यांनी ट्रायबल टँलेंट सर्च फाऊंडेशनच्या वतीने शहादा येथे आयोजित समारंभप्रसंगी केले.अनसपाडा ता.पेठ येथील आदिवासी समाजातील डॉ.योगेश भरसट नुकतेच आयएएस झाल्याने समाजातील युवकांना त्यांचे मार्गदर्शन व्हावे या अनुशंगाने ट्रायबल टँलेंट सर्च फाउंडेशन च्या वतीने टाऊन हॉल मध्ये आयोजित सत्कार समारंभात डॉ.भरसट बोलत होते.

शैक्षणिक चळवळ महत्वाची
पुढे बोलतांना डॉ.भरसट म्हणाले आदिवासींच्या सामाजिक विकासासाठी शैक्षणिक चळवळ महत्वाची भुमिका बजावू शकते.कारण सामाजिक व राजकीय चळवळीपेक्षा ही शैक्षणिक चळवळ महत्वाची आहे. शैक्षणिक चळवळीमुळेच आदिवासी समाजातील न्युनगंडपणा आता कमी झाला आहे.आदिवासी युवकांनी न्युनगंडपणा बाजुला ठेवून स्वत:चा व सामाजिक विकासासाठी तयार राहिले पाहिजे.त्याकरीता निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. निश्चित ध्येयपुर्तीसाठी स्वप्न जरूर पाहीले पाहिजे परंतु अशी स्वप्न बघा की,जे आपली झोप उडवू शकतील तुम्ही तुमच्यातले टँलेंट शोधण्यासाठी स्वत:ला ओळखले पाहिजे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी अजय खर्डे (आयआरएस),डॉ.तुकाराम रोमटे,इंजी.झेलसिंग पावरा, यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सुत्रसंचालन प्रा.संजय पावरा यांनी केले तर वसंत पावरा, युवराज पावरा, अशोक वळवी,विश्वनाथ पावरा, दशरथ मोरे.रायसिंग डुडवे, राजेश पावरा यांच्यासह सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

डॉ.योगेश भरसट यांचा सत्कार
जेष्ठ साहित्यीक वाहरू सोनवणे, आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळाचे इंजी.झेलसिंग पावरा,उपवनसंरक्षक एस.आर.मोरे, अजय खर्डे(आयआरएस), डॉक्टर असोसिनचे डॉ.राजेश वळवी, डॉ.भरत वळवी, पुणे येथिल सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे मराठी विभाग प्रखम डॉ.तुकाराम रोमटे ,एम.के.कोकडे,नामदेव पटेल,अनिल वळवी, आदि उपस्थित होते.याप्रसंगी आदिवासी समाजाचा विविध संघटना व फाउंडेशच्या वतीने डॉ.योगेश भरसट यांचा सत्कार करण्यात आला.