मुंबई: विरोधकांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकारमध्ये फुट पडण्याचे प्रयत्न सुरु आहे. महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही असा प्रचार विरोधकांकडून सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुटणार नाही. ‘यह दीवार टूटती क्यू नही’ असे म्हणण्याची वेळ विरोधकांवर येईल असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला. मुंबई येथे ‘मुंबई महानगरपालिका मिशन २०२२’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची कार्यकर्ता शिबीर घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
शरमेने मान खाली खालावे लागेल असे कृत्य करू नका
केवळ पदासाठी काम करणाऱ्यांनी पक्ष सोडले तरी चालेल. विरोधात असताना दूर असणारे आज सत्तेत आल्यानंतर जवळ आले आहे, असे पक्षाच्या नजरेत आले आहे. अशा लोकांपासून सावध रहा असे सांगत पक्षाचे प्रमुख शरद पवार, मला आणि माझ्यासहित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शरमेने मान खाली घालावे लागेल असे कृत्य करू नका अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी देत पक्षासाठी आणि सामन्यांसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन केले आहे.