मियामी । मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या सलामीला कॅनडाची इयुगेनी बुचार्ड आणि सर्बियाच्या येलेना यांकाोविकला पराभवाचा सामना करावा लागला. दोघींचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वाइल्ड कार्डधारक एशलिग बार्टीने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात बुचार्डविरुद्ध सनसनाटी विजय संपादन केला.तिने 6-4, 5-7, 6-3 अशा फरकाने विजयी सलामी दिली. या विजयामुळे तिला दुसर्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. तिने विजयासाठी शर्थीची झुंज दिली.
मोनिका दुसर्या फेरीत
दुसरीकडे झुंज अपयशी ठरल्याने कॅनडाच्या बुचार्डला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिने दुसर्या सेटमध्ये बाजी मारून लढतीत बरोबरी साधली होती. मात्र, तिला निर्णायक तिसर्या सेटमध्ये सुमार खेळीचा फटका बसला. त्यामुळे तिला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीला दुसर्या फेरीत आपल्याच देशाच्या समथा स्टोसुरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मोनिका पुइंगने त विजयी सलामी दिली. त्यापाठोपाठ रोमानियाच्या मारियाला इंग्लंडच्या हीथर वॉटसनने 7-6, 6-1 ने हरवले. कझाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेदोवाने सलामीला सर्बियाच्या येलेना यांकोविकला पराभूत केले.