नागपूर-एका खटल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने चिडलेल्या एका सरकारी वकिलाने थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे आज घडला. याप्रकरणी हल्लेखोर वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्या. के.आर.देशपांडे असे मारहाण झालेल्या न्यायाधिशांचे नाव असून ते सिव्हील कोर्टात न्यायाधीश आहेत. तर अॅड.समीर पराटे असे हल्लेखोर सरकारी वकिलाचे नाव आहे. अॅड. पराटे यांच्या वडिलांवरील एका खटल्यासंदर्भातील याचिका न्या.देशपांडे यांनी आज फेटाळून लावली. त्यानंतर चिडलेल्या पराटे यांनी न्या. देशपांडे यांच्या जोरदार कानशिलात लगावली.
या हल्ल्याच्या घटनेनंतर सेशन जज वसंत कुलकर्णी यांच्या चेंबरमध्ये तातडीने न्यायाधीशांची महत्वाची बैठक घेण्यात आली. सरकारी वकिल अॅड. समीर पराटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे.