याचिकेवर 11 रोजी सुनावणी

0

भुसावळ । येथील पालिकेत अपक्ष नगरसेवकास गटनेता केल्यामुळे जनाधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिका दाखल केली होती. मंगळवार 14 रोजी भाजपाचे गटनेता व नगरसेवक यांना सुनावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी बोलाविले असता सुावणीसाठी 11 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.

भाजपचे गटनेता हाजी मुन्ना तेली, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक बोधराज चौधरी व अमोल इंगळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना मंगळवारी खुलाशासाठी पुढील तारीख देण्यात यावी अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकार्‍यांनी 11 एप्रिल सुनावणीची तारीख भाजपाचे गटनेता यांना देण्यात देण्यात आली. दरम्यान जनाधार विकास पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकुर व त्यांच्यासोबत चार वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याचिकेबद्दल कामकाज पाहिले.