जागेच्या मागणीसाठी दिंडी प्रमुखांना आवाहन
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्यावतीने आळंदी यात्रा काळात देवस्थानची गायरान मोकळी जागा वापरास खुली करण्यात आली आहे. भाविक, वारकरी, दिंडीप्रमुखांनी जागेच्या मागणीसाठी देवस्थानची पूर्व परवानगी घेऊन वापरण्याचे आवाहन प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी केले आहे. आळंदी देवस्थानची वापराविना पडून असलेली गायरान जमीन सुमारे 435 एकर आहे. यापूर्वी गायरान शिक्का असल्याने जमीन वापरण्यात अडथळा येत होता. राज्य शासनाचे महसूल विभागाने गायरान उल्लेख रद्द केला आहे. आता केवळ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी एकमेव या जागेची मालक आहे. यामुळे आळंदीत भरणार्या आषाढीसह कार्तिकी यंत्रे दरम्यान निवासाची सोया नसलेल्या दिंड्यांना तसेच भाविकांना या ठिकाणी राहण्याची तात्पुर्ती व्यवस्था होणार आहे. देवस्थानची पूर्व परवानगी घेऊन जागा वापरास देण्यात येणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले. आळंदी येथील डोंगर उतार व पठार मैदान आहे. आळंदी देवस्थानच्या निर्णयाचे आळंदीतील वारकरी संप्रदायात तसेच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी ही स्वागत केले आहे.