भडगाव। अमरनाथ यात्रा सुरु असतांना यात्रेकरुच्या बसवरील झालेल्या अतिरेकी हल्यातुन यात्रेकरुचे प्राण वाचवून लष्करी छावणीपर्यंत सुखरूप पोहचविणारा बस चालक सलिम शेख यांचा तालुक्यातील मुळ गावी पिंपरखेड येथे ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला. यावेळी आमदार सतिष पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी सभापती प्रदीप पवार, प्रतापराव पाटील, नगराध्यक्ष शामकांत भोसले, तहसिलदार सी.एम.वाघ, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, जि.प.सदस्य स्नेहा गायकवाड, श्रावण लिंडायत, भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरपंच सुशिला भिल, उपसरपंच मनोज राजपुत आदी उपस्थित होते.
पिंपरखेड गावाचा रहिवाशी असल्याचा अभिमान- सलिम शेख प्रसंगावधान पाहुन जिवाची बाजी लावुन बस चालक सलिम शेख यांनी जवळजवळ 50 यात्रेकरुचे प्राण वाचविले होते. त्याचे देशभरात कौतुक झाले होते. तालुक्यातील मुळ गावी पिंपरखेड येथे त्यांचे भव्य सत्कार करण्यात आला. त्याअगोदर गावातुन ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. सलिम शेख यांनी मनोगत व्यक्त करत, पिंपरखेड हे माझे गाव आहे हे मी अभिमानाने सांगतो. गावाकडून जो माझा सत्कार करण्यात आला त्याने मी भारावुन गेलो. यावेळी आमदार सतिष पाटील, प्रदीप पवार, अनिल चौधरींसह आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.