शहादा । तालुक्यातील म्हसावद गावातील तोरणमाळ व सुलतानपुर रस्त्या लगत डाव्या व उजव्या बाजूस कच्चे – पक्के अतिक्रमण व्यवसायिकांनी केले. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक 5 मधील प्रजिमा क्रमांक 10 या रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बांधकाम विभागाकडुन 241 जणांना बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण काढू नये म्हणून व्यावसायिकांसह उपसरपंच चिंतामण धनगर यांनी शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री सांळुखे यांची भेट घेऊन म्हसावद गावाची यात्रा संपे पर्यंत अतिक्रमण न काढण्याचे निवेदन दिले. यात्रे दरम्यान अतिक्रमण काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता .श्री सांळुखेंनी सकारात्मक चर्चा करून तूर्तास अतिक्रमण न काढण्याचे आश्वासन दिले आहे.
15 दिवस चालणार यात्रा
म्हसावद गावात रिद्धी-सिद्धी ची यात्रा 5 जानेवारीपासून प्रारंभ होत असून 15 दिवस चालणार्या या यात्रेमुळे जो रोजगार मिळणार आहे तोही मिळणार नाही व उघड्यावर येऊन उपासमारीची वेळ येईल म्हणून म्हसावद गावातील 241 अतिक्रमणधारकांनी व ग्रामपंचायतीचे उपसरपंच चिंतामण धनगरांसह ग्रामपंचायत सदस्य मदन पवार, मुकूंद आहिरे सिंधू शेमळे लत्ताबाई पाटील , अनिल पाटील. ,छायाबाई चधरी, राजु ठाकरे, शांतीबाई भिल आदिंसह गत्तम पेंटर, दिपक लांमगे, विजय वाघ, अजय पवार ,क्रिष्णा जगदेव, संजय वागले, मनिलाल पाटील, संदीप पाटील, प्रकाश धोबी यांच्यासह सर्व अतिक्रमितांनी उपविभागीय अभियंता श्री सांळुखे यांची भेट घेऊन म्हसावद यात्रासंपेपर्यंत अतिक्रमण न काढण्याचे निवेदन देऊन मागणी केली. अभियंता श्री सांळुखे यांनी सकारात्मक चर्चा करून अतिक्रमितांना याञा संपे पर्यंत अतिक्रमण न काढण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना तुर्तास दिलासा मिळला आहे.
दुहेरीकरणाच्या कामास सुरूवात
महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक 5 मधील प्रजिमा क्रमांक 10 या रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने या रस्त्यावरील प्रकाशा, वजाली ,जावदे त बो, कुढावद मार्गे म्हसावद ते सुलतानपुर खेतिता पर्यंत रस्ता दुहेरीकरण कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने या रस्त्यांवरील गावातील रस्त्यांकडील अतिक्रमण शहादा बाधंकाम विभागाकडुन काढण्यासाठी मोहीम राबविली जात असून अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याची 241 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे अतिक्रमितांचे धाबे दणाणले होते.