यात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी पथदिवे सुरू करावे : भाजपा युवा मोर्चा

0

धुळे । सप्तश्रृंगी गडावर यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी खान्देशातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी जात असतात. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील धुळे ते मालेगावपयर्ंतच्या मुख्य महामार्ग सुरु करा व रस्त्यावरील खड्डे बुजवा आणि रस्ते स्वच्छ करुन चालण्यासाठी सुस्थितीत करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चच्या वतीने उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

10 एप्रिल रोजी सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी खान्देशातून भाविक पायी जात असतात. या पार्श्‍वभूमीवर महामार्गावरील धुळे ते मालेगावपर्यंतच्या रस्त्यावरील बंद पथ पथदिवे सुरू करा. महामार्गावरील पथदिवे सुरू असणे व रस्ता स्वच्छ व चकचकीत असणे अत्यावश्यक आहे. पथदिव्या तात्काळ दुरूस्त करावे, तसेच महामार्गावरील खड्डे तात्काळ बजुविण्यात यावे. रस्त्यावरील काचाच्या तुकडे, तार टोकदार लोखंडी वस्तु, खिळे इ. उचलून रस्ता स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नितीन प्रकाश पाटील, युवराज पाटील, स्वप्नील लोकरे, राहुल बाविस्कर, निनाद पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, योगेश शिंदे, संदीप खंडागळे, भूपेश बडगुजर, योगेश बडगुजर, जीवन शेडगे, अमित भोसले आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.