यादवनगरमधील पाण्याच्या वॉलच्या बाजूस पडलेला खड्डा बुजवण्याची मागणी 

0
चिखली :  चिखली येथील यादवनगर परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ पाणी सोडण्याचा वॉल आहे. या वॉलच्या बाजूला खड्डा पडलेला आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर वारवांर पाणी साचत आहे. परिसरातील चारचाकी तसेच इतर वाहने या खड्यावरून सारखी ये-जा करीत असतात. त्यामुळे पाणी सोडण्याच्या वॉलचे नुकसान तर होतच असून, अनेक वेळा अपघातसदृश्य स्थितीही निर्माण होत आहे.
या घटनेची दखल घेत स्वी नगरसेवक दिनेश यादव यांनी मनपा पाणी पुरवठा अधिकारी शिंदे यांची भेट घेतली व त्यांना वॉलची उंची वाढवून खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. यावेळी लवकरच मनपाच्या वतीने खड्डा बुजवण्यात येईल, असे आश्‍वासन शिंदे यांनी यादव यांना दिले आहे.