यादवने केले मॅक्सवेलच्या बॅटचे 2 तुकडे

0

रांची । रांचीमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसरी कसोटी कांगारू व भारतासाठी महत्वाची आहे. दुसर्‍या दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाला,त्यावेळी उमेश यादवने ‘ताकद’वान सुरूवात करून दाखवून दिले की, त्याची गोलंदाजी खेळणे साधेसुधे नाही आहे. दुस़र्‍या दिवसाचा खेळ सुरू झाला . तेव्हा उमेश यादवने पहिला टाकलेला चेंडू मॅक्सवेलने डिफेन्सीव्ह खेळला, पण यादवच्या चेंडूचा आघात इतका घातक होता की मॅक्सवेलच्या बॅटचे दोन तुकडेच झाले.

मॅक्सवेलच्या चेह़र्‍यावर हसू उमटले
पहिला दिवसा खेळ संपला तेव्हा कर्णधार स्मिथ 123 धावा व मॅक्सवेल 82 धावांवर खेळत होते.दुसर्‍या दिवसाची सुरवात झाली तेव्हा उमेश यादवने आपल्या ताकदीचा जलवा दाखवून दिला.उमेश यादवने टाकलेला चेंडू मॅक्सवेलने डिफेन्सीव्ह खेळला, प्र्र्रण यादवच्या चेंडूचा आघात इतका घातक होता की मॅक्सवेलच्या बॅटचे दोन तुकडे झाले. मॅक्सवेलच्या हातात केवळ बॅटचा दांडुका शिल्लक राहिला. उमेश यादवने घडलेल्या प्रसंगानंतर आपले दंड थोपटून मॅक्सवेलला आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. आपली तुटलेली बॅट पाहून मॅक्सवेलच्या चेह़र्‍यावर हसू उमटले.असे झाल्यावर नविन बॅट मागवून आपले पहिले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यावर मॅक्सवेला जडेजाने 104 धावांवर तबूत परत पाठविले.