यापुढे उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोत दिसणार

0

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार यापुढे निवडणूक लढणार्‍या उमेदवारांना नामांकन अर्ज भरताना पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोतही सांगावा लागणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

यासाठी आचारसंहितेमध्ये सुधारणा करत प्रतिज्ञापत्रात एका नव्या रकान्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवाराला आपला आणि आपल्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोत द्यावा लागणार आहे. गतवर्षी योजना आयोगाने यासंबंधी कायदा मंत्रालयाशी संपर्कही साधला होता. यामुळे निवडणूक प्रक्रियेत आणखी पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. यासंबंधी काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. सुलभ लोकशाहीसाठी हे केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे मतदाराला उमेदवार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत महिती होतील. नवा नियम गत महिन्यातील 7 एप्रिल रोजी कायदा मंत्रालयाने अधिसूचित केला आहे.