यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात ‘फुले पगडी’चाच वापर

0

पुणे :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिननिमित्त पुण्यात रविवारी पार पडलेल्या हल्लाबोल सांगता सभेच्या कार्यक्रमात पुण्याच्या परंपरेप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘फुले पगडी’चाच वापर करण्याचे आदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.

रविवारी झालेल्या हल्लाबोल सांगता सभेच्या कार्यक्रमात आलेल्या शरद पवारांचे व छगन भुजबळ यांचे स्वागत पुणेरी पगडी देऊनच करण्यात आले. परंतू कार्यक्रमाच्या शेवटी शरद पवार जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी महात्मा फुले पगडी देऊन भुजबळांचा सत्कार केला. इतकचं नाही तर पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पुढं बोलावले आणि फुले पगडी त्यांच्या हातात दिली. तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचे, असा आदेश दिला.