मुंबई : ‘उरी’या चित्रपटासाठी यामी गौतम हिने आपले केस कापले आहेत. व्यक्तीरेखेसाठी तिला केस अगदी बारीक करावे लागले. यामुळे वडीलांना याचा स्वीकार करणे जड गेल्याचे तिने म्हटलंय. यामीलाही लांब केसांची सवय विसरणे कठीण जातंय.
”ज्या दिवशी मी लांब केस कापले तेव्हा त्याची आठवण करीत होते, कारण केसांना स्पर्श करण्याची मला सवय होती. पण आता ही सवय झालीय. माझ्या आईला आणि बहिणीला ही हेअर स्टाईल आवडली. पण वडीलांना छोट्या केसात मला स्वीकारणे अवघड गेले.”असे ती म्हणाली.
”यापूर्वी मी जेव्हा इयत्ता ७ वीत होते तेव्हा केस बारीक केले होते. त्यामुळे मी जेव्हा छोट्या केसात दिसले तेव्हा वडीलांना वाटले की, मी विग लावलाय. त्यांनी मला विचारलंही की, हे केस खरे आहेत का ? आणि मी जेव्हा सांगितले तेव्हा ते दुःखी झाले. पण जेव्हा लोक मला सुंदर दिसतेस म्हणायला लागले तेव्हा ते खूश झाले.” असेही यामी म्हणाली.