नवी दिल्ली: यावर्षी वर्षभरात ६९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. तसेच वर्षभरात १२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी भारतीय सीमेवर घुसखोरी करणाऱ्या ४१ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यात २५ दहशतवादी जैश-ए-महम्मद तर १३ दहशतवादी पाकिस्तानशी संबंधित असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे सीओआरपीएस केजीएस धिल्लोन यांनी दिली.