यावर्षी चाळीसगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व नऊ कृषी मंडळात सलग ३१ दिवस पावसाने खंड दिला आहे. पीक आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व साठवण तलाव कोरडे आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता तालुक्यातील सर्वाच्या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा लागू करावा. तसेच सर्वच पिकांसोबत फळबागा चा देखील पिक विमा मध्ये समावेश करावा. या मागणी साठी माननीय कृषिमंत्री धनाजय जी मुंडे साहेब यांची भेट घेतली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती शेतीची बिकट अवस्था याची सविस्तर माहिती दिली.
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी पीक वीमापासून वंचित राहणार नाही अस आश्वासन मा. कृषिमंत्री यांनी दिलय.
आपला
प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच