मुंबई – गेले अनेक वर्ष प्लास्टिक झेंड्याचा विरोध होत होता. राज्य सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यामुळे यंदा पर्यावरणपूरक झेंडावंदन होणार आहे. प्लास्टिकच्या झेंड्यावर बंदी तर आहेच पण यावर्षी खिशाला लावण्यात येणार झेंडेही नायलॉनच्या कापडाचे तयार करण्यात आले आहेत.
केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाखो नागरिक झेंडे घेऊन देशप्रेम व्यक्त करतात. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचा त्या दिवशी गल्ला ही जमतो. प्लास्टिकच्या झेंड्याचा तुलनेत कापडी झेंड्यांचा दर जास्त आहे. त्या दिवशी मात्र एवढ्या किरकोळ फरकाचा विचार न कराता नागरिक सध्या कापडी झेंड्यांचा स्वीकार करत असल्याचे ही पवार यांनी सांगितले.