जळगाव । जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राशी 659 बी.जी.2 या कापुस वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपुर्ण राज्यभर या वाणावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009-10 च्या कलम 12(8) नुसार राज्यभर या बियाण्याच विक्रीस बंद आहे.
बियाण्यांचे पक्के बिल घेण्याचे आवाहन
राशी 659 बी.जी.2 या कापुस वाणावर बंदी घालण्यात आल्याने जिल्ह्यात हे वाण उपलब्ध नसल्याने यावर्षी तरी राशी 659 हे बियाणे मिळणार नाही. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांनी जमिनीच्या प्रतवारी व पाण्याच्या उपलब्धतेनुसार बाजारापेठेतील अन्य चांगल्या वाणांची पक्की पावती घेऊनच लागवड करण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामाच्या लागवडीला थोंड्याच दिवसात सुरुवात होणार आहे. शेतकर्यांकडून या वाणाला सर्वाधिक मागणी होती. या वाणावरील बंदी उठवावी अशी मागणीही करण्यात येत होती. जिल्हा परिषदेत 26 रोजी झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत या वाणावरील बंदी उठवावी यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. राशी 659 या वाणाचे बियाणे मिळणार नसल्याने शेतकर्यांचे हिरमोड झाले आहे.